अश्विनसिंह गौतम राज्यस्तरीय शिवछत्रपती गौरव पुरस्काराने सन्मानित

0
24

अर्जुनी मोरगाव, : स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा, जलसाक्षरता, व्यसनमुक्ती, दिव्यांग सहायता, वृक्ष लागवड, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना सहायता निधी उपलब्ध करून दिले. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात सर्वोत्कृष्ट भूमिका पार पाडली अशा अनेक सामाजिक उपक्रम आणि सामाजिक कार्याकरिता महाराष्ट्र शासन संलग्न संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (नाशिक) तर्फे राज्यातील 21 होतकरू गुणवंतांची निवड करून नाशिक स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 21 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता अश्विनसिंह गौतम यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अश्विनसिंह गौतम हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रियतेने कार्य करीत आहेत. 26 जानेवारी 2024 गणराज्य दिनाच्या औचित्य पर त्यांना पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजित कार्यक्रमा प्रसंगी शेतकरी नेते व अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य रविकांत तुपकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वजे , खासदार शोभाताई बच्छाव ,पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, आमदार माणिकराव कोकाटे विधानसभा क्षेत्र सिन्नर, व्याख्यांनकार उदय सांगळे, चेअरमन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य डॉक्टर ज्ञानेश्वर वसंतराव सानप, आदी प्रामुख्याने उपस्थित होते अश्विनसिह गौतम यांचा समस्त गोंदिया जिल्हा वाशियांनकडून अभिनंदन करण्यात येत आहे.