गोंदिया: वनपरिक्षेत्र कार्यालय दक्षिण देवरी अंतर्गत अधिनस्त कर्मचारी व WTI चे वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्यासह कोसबी उपक्षेत्रातील नियतक्षेत्र कोसबी संरक्षित वनाचे कक्ष क्र,.603 मध्ये वनालगत व शेती परिसरात गस्ती करीत असतांना शेतात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उददेशाने ताराचे फासे झोपडी मध्ये ठेवलेले दिसुन आले. तेव्हा वन अधिकार्यानी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16),2(35),9,50,51 नुसार आरोपीस शेतमालक बारसाय हगरु कार्टेंगा वय 50 वर्ष रा.कोसबीता.देवरी जि, गोदिया याला दिनांक 26.08.2024 रोजी अटक करुन 27/08/2024 रोजी मा.न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालय देवरी यांच्या समक्ष हजर करण्यात आले.
सदर प्रकरणी न्यायालयाने आरोपीला न्यायालयाने जामीन सुनावली आहे. सदर वन गुन्हा प्रकरणी वन अधिकार्यांनी आरोपीकडुन वन्यप्राण्यांच्या शिकारी करीता उपयोगात येणारे शेतातील झोपडी मध्ये ताराचे फासे जप्त केले आहे.
सदर कार्यवाही गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु व कॅम्पा) गोंदियाचे योगेन्द्र सिंह यांच्या नेतृत्वात देवरी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी बंडु नाना चिडे, क्षेत्र सहाय्यक एच. एस. गोस्वामी,डी. एच.बिसेन, वनरक्षक कु.बि.टी.राहांगडाले, आर.आर भीवगडे,बि. एस. खुळश्याम, के.झेड, बिजेवार, आर जी.थोरले वनमजुर कृणाल मुलतानी यांनी केली.