अकोला,दि.०६ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यात चोहोट्टा बाजार नजीक असलेल्या टाकळी खु. गावच्या सरपंच व त्यांच्या वडिलांना अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांची लाचेचिवरक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
टाकळी खू.गावातील खुल्या ले आऊट झालेल्या प्लॉट वर घर बांधण्याकरिता परवानगी देण्यासाठी तक्रारदाराला ४० हजार रुपयांची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांची रक्कम अडव्हांस म्हणून मागण्यात आली होती.परंतु तक्रारदाराला ही लाच रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने अकोला लाचलुचपत विभागाला तक्रार दिली असता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता ४० हजार लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपये आगावू रक्कम मागण्यात आली होती.
अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज त्यासाठी लावलेल्या सापळ्यात दोघेही पिता व सरपंच कन्या अडकली असून ह्या दोघांनाही लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.प्रज्ञा दामोदर टाकळी खुर्द..सरपंच. जगजीवन दामोधर सरपंच महिलेचे वडील अशी दोघांची नावे आहेत.ह्या दोघांनाही ताब्यात घेवून दहीहंडा पोलिस स्टेशनला पुढील कारवाईसाठी नेण्यात येत असून पुढील कारवाई एसीबीचे अधिकारी करीत आहेत.सदरची कारवाई अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलींद बहकार यांच्या नेतृत्वात पो.नी.नरेंद्र खैरनार, पो.नी.सचिन सावंत, पो.अंमलदार संदीप ताले,दिगंबर जाधव,शैलेश पळसपगार,महिला पो.कॉ.प्रिया सुरवाडे यांनी केली आहे.