देवरीतील अग्रेसन चौकात भिषण अपघात, स्विफ्ट वाहन चकनाचूर

0
323

देवरी,दि.१०ः शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील अग्रेसन चौकात ९ आक्टोंबरच्या रात्रीच्या सुमारास ट्रकने स्विफ्ट कारला दिलेल्या जोरदार धडकेत वाहन चकनाचूर झाले.तर वाहन चालक गंभीर असल्याचे वृत्त आहे. देवरी येथे महामार्गावर दुतर्फा मोठे ट्रक आणि इतर वाहनांच्या रांगा लागून असल्यामुळे अपघातात वाढ होत असल्याचे बघावयास मिळत आहे. ट्रक चालक आपले वाहन उभे करून देवरी येथील बाजारात तसेच चहापाणी आणि जेवणासाठी जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळते आणि अपघातांना आमंत्रण दिले जाते. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.