स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांची कारवाई
गोंदिया : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी झाली आहे. चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात होते. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अट्टल दुचाकी चोरट्यांना उमरेड जि. नागपूर येथून जेरबंद करण्यात यश मिळविले. चोरट्याकडून ११ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई २० ऑक्टोबरला करण्यात आली. विक्की वसंता रामटेके (२७) रा. मंगळवारी पेठ उमरेड जि. नागपूर व विक्रम रामेश्वर उके (४२) रा. नारायण नगर उमरेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे की, जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत चोरटे दुचाकींवर डोळा ठेवून लंपास करीत असल्याच्या तक्रारी नोंद होत आहेत. या अनुसंगाने पोलिस तपासकामी होते. वाढत्या दुचाकीच्या चोरीच्या घटनांवर लगाम लावून चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. गोपनीय माहिती संकलीत करणे, जिल्हा व जिल्ह्या बाहेरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी व गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणी करून करण्यात आली. समांतर तपासामध्ये तिरोडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात विक्की वसंता रामटेके व विक्रम रामेश्वर उके या दोन्ही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उमरेड गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिनेश लबडे, तिरोडाचे पोनि अमित वानखेडे, पो.अं.प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, छगन विठ्ठले व तिरोडा पोलिस पथकाने संयुक्तरित्या केली