ईसापुर येथे बालकावर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

0
124

पुसद  : खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ईसापुर येथे एका बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना 6 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मोईज शेख अजीज वय 75 वर्ष रा. ईसापुर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा बारा वर्षाचा नातू शेजारी राहत असलेल्या आरोपी वसीम रजा शौकीन अहमद वय 24वर्ष रा. जामा मस्जिद जवळ नानई तहसील हसनपुर जिल्हा अमरोहा ( उत्तर प्रदेश) हल्ली मुक्काम ईसापुर याच्याकडे कुरानाचे पठण करण्याकरिता गेला असता आरोपीने बालकावर लैंगिक अत्याचार केले.

खंडाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 405/2024 कलम4,6, बाल लैंगिक अत्याचार सण 2012 अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला. सदर (Sexual abuse Case) प्रकरणात वरिष्ठांना माहिती देऊन खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वसीम रजा शौकीन अहमद याचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली. गावामध्ये तात्काळ बंदोबस्त तैनात करून कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. सदर ठिकाणी मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी तात्काळ शांतता कमिटीची बैठक घेतली.

गावामध्ये शांतता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील, पोलीस हवालदार अकिल चव्हाण,पोलीस हवालदार गोपाल मोरे व पोलीस कॉन्स्टेबल निरंजन राठोड यांनी केली.