निवडणूक निरीक्षक सामान्य सुनिल कुमार यांची चेकपोस्टला भेट

0
78

गोंदिया, दि.8  :  64-तिरोडा  विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) सुनिल कुमार यांनी तिरोडा विधानसभा अंतर्गत निवडणूक तपासणी पथक नाका SST बोंडरानी हद्द, नवेगाव खुर्द ता.तिरोडा आणि मुंडीपार, सोनी ता.गोरेगाव येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी उपलब्ध दस्तऐवजांची तपासणी केली. तसेच वाहन तपासणी करताना वाहने योग्य पद्धतीने तपासले जातात का तसेच प्रत्येक तपासणी होते का याविषयी माहिती जाणून घेतली व सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी निलेश कानवडे, नोडल अधिकारी पंकज जिभकाटे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.