अर्जुनी/मोरगाव :- अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील शितल बार या विदेशी दारु (Foreign liquor) दुकानातुन परिसरात विक्री करिता काही व्यक्ति विदेशी दारुची अवैध वाहतुक होत आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत संपूर्ण अवैध धंदे तेथील पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी बंद केले . मद्यपींनाराना केशोरी येथून, गोठणगाव येथे मद्यपान करायला ये-जा करावी लागते आहे. यामुळे मद्यपी यांचा फायदा घेण्यासाठी काही व्यक्ती गोठणगाव येथील शितल बार विदेशी दारु दुकानातुन विदेशी दारुची अवैध वाहतुक करुन परिसरातील गावांमध्ये मद्यपी यांना विक्री करिता घेऊन जातात. व मद्यपींना जास्त दराने विक्री करतात. याकडे सबंधित उत्पादन शुल्क विभाग डोळे झाकुन गप्प असल्याचे पहावयास मिळते. अशा बेजबाबदार बार मालकांना अभय कुणाचे? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. यावरती सबंधित उत्पादन शुल्क विभागाने शितल बार विदेशी दारु दुकानाचे परवाने(licenses) रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.