लाचखोर पीएसआय चंदन मोरे अमरावती एसीबीच्या सापळ्यात अडकला…

0
134
अमरावती-राज्यात सर्वत्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान बंदोबस्त कमी एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर गुंतवून ठेवण्यात आल्याने थंडावलेल्या लाचखोरांना वेसण घालण्याच्या कारवाया आता पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात आल्या असून राज्यातील निवडणुका संपल्यानंतरची पहिलीच कारवाई करण्याचा मान हा अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळविला आहे.
 
   चंदन सोनाजी मोरे, वय ५२ वर्षे, पद श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ब.न. १०४१ (वर्ग-३) पो.स्टे. नागपुरी गेट अमरावती शहर असे ह्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला आज १२ वाजताच्या दरम्यान लाचेची २००० रुपयांची रक्कम घेत असताना जिल्हा परीषद अमरावती कार्यालया समोर रंगेहाथ पकडले आहे.
 
   थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की, यातील तकारदार यांचे विरूध्द पोस्टे. नागपुरी गेट,अमरावती शहर येथे अप नं. ४५६/२०२४ अन्वये गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हयात तकारदार यांचे बाजुने तपास करून प्रतिबंधात्मक कार्यवाही मध्ये मदत करण्यासाठी तसेच नमुद प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदार यांना १०,००० रूप्यांची लाचेची मागणी करत असलेबाबत दि.२५/११/२०२४ रोजी लेखी तक्रार दिली होती.
 
    फिर्यादीने दिलेल्या तकारीच्या अनुषंगाने काल सोमवार दि.२५/११/२०२४ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान लाचखोर पीएसआय चंदन मोरे यांने नमुद गुन्ह्यात तकारदार यांचे बाजुने तपास करून प्रतिबंधात्मक कार्यवाही मध्ये प्रकरण  मिटवण्यासाठी तडजोडीअंती तकारदार यांनी २००० रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे तयारी दाखविल्या वरून आज मंगळवार दि.२६/११/२०२४ रोजी आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान पीएसआय चंदन मोरे यांने तक्राररदार यांचेकडुन पंचासमक्ष २००० रूपये स्विकारले असता लाचखोर चंदन मोरे यांस ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्याविरूध्द पो.स्टे. गाडगेनगर अमरावती येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
 
     सदरची कार्यवाही मंगेश मोहोड, पोलीस उप अधिक्षक,एसीबी अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई पथकातील पो.नि. केतन मांजरे,पो.हे.कॉ प्रमोद रायपुरे,अतुल टाकरखेडे,पो.ना. महेंद्र साखरे, कृणाल काकडे पो.कॉ शैलेश कडु चालक पो.हे.कॉ.चंद्रकांत जनबंधु यांनी पार पाडली.