पोलीस कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
369
तिरोडा,दि.२५ः-स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तिलक वार्ड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर असे की,सदर घटना जुलै ते नोव्हेंबर २०२४ दरम्यानची असून अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पिडिताने पालकांना दिली.त्याआधारे फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव इत्फेखार शेख (३०) रा.हरिओम नगर तिलक वार्ड तिरोडा असे आहे.
   सविस्तर असे की, तिरोडा पोलीस ठाण्यात इफ्तेखार शेख पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.सदर पोलीस कर्मचारी तिलक वार्ड येथे भाड्याची खोली करून राहतो. त्यातच घराशेजारच्या एका अल्पवयीन मुलीशी त्याने पाच महिन्यापूर्वी प्रेम सबंध प्रस्थापित केले. दरम्यान आगामी काळात लग्न करण्याचेही आमिष दर्शविले. त्यातूनच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. यावरून लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी इफ्तेखार शेख यांच्याविरुद्ध कलम ६४(ए) ६९(ए) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या सहकलम ४,६ पोस्को अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोनी.अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनी.दिव्या बरड व पोहवा. तिरपुडे करीत आहेत.