देवरी,दि.०७ः देवरी चिचगड मार्गावरील सालई गावाजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचे मुंडके वेगळ व शऱीर वेगळे झाल्याची घटना ६ जानेवारीच्या सायकांळी घडली.सदर अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने घडल्याचे वृत्त आहे.
अपघातातील मृत इसमाचे नाव निकेश आत्माराम कराडे वय 32,रा. मोहगाव(आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया असे आहे. सदर मृत व्यक्ती हा MIDC देवरी येथे ऐका कारखान्यात कामाला कार्यरत होता.सोमवारी सांयकाळी 6.00 वाजेच्या सुमारास कामावरुन सुट्टी झाल्यावर आपल्या दुचाकी क्र. MH 35 AV 2968 ने गावाकडे परत जात असतानीं अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात येवढा भिषण होता की दुचाकी चालक निकेश कराडे या युवकाचे मुंडके व शरीर वेगळे झालेले होते. सदर घटनेची माहीती परीसरातुन आवागमन करनार्या नागरीकांना देवरी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करत मृत व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेत मृतदेह उत्तरीयतपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविले. सदर घटनेची नोदं देवरी पोलीस स्टेशनला करण्यात आली असुन अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोदं करत वाहन व वाहनचालकचा शोध देवरी पोलीस करीत आहे.