जि.प.व शासकीय कर्म.सह.पतसंस्था भंडारा/गोंदिया शाखा कोहमाराच्यावतीने नवनियुक्त आमदार बडोलेंचा सत्कार
सडक अर्जुनी,दि.०७: जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारा/गोंदिया शाखा कोहमारा येथे पतसंस्थेच्या मृत्यूफंड योजनेतर्गत दिवंगत सभासदांच्या वारसास दोन लक्ष रुपयाचा धनादेश वितरण कार्यक्रम व नवनियुक्त आमदार राजकुमार बडोले यांचा सत्कार सोमवारला (दि.६)पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांच्या मार्गदर्शनात शाखेचे अध्यक्ष कैलास हांडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
संस्थेच्यावतीने नवनियुक्त आमदार राजकुमार बडोले यांचे पतसंस्थेच्या वतीने संविधान पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आले.तसेच प्रचलित मृत्यूफंड योजनेअंतर्गत निधन झालेल्या सभासदांचे 14 लक्ष पर्यंतचे कर्ज माफ केले जाते तथा कर्ज नसलेल्या दिवंगत सभासदांच्या वारसांना दोन लक्ष निधी दिला जातो.त्या अंतर्गत या कार्यक्रमात आ.बडोलेंच्या हस्ते दिवंगत सभासद पुंडलिक वकेकर यांच्या वारसांना दोन लक्ष निधीचा धनादेश वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाला सत्कारमूर्ती आमदार राजकुमार बडोले,जिल्हा परिषद गोंदियाचे सदस्य लायकराम भेंडारकर,गटशिक्षणाधिकारी बागडे, पंचायत समिती उपसभापती राजेश कठाने, संचालक विजय डोये,संचालक विनोद चौधरी,संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर,माजी संचालक योगेश्वर मुंगलमारे,शिक्षक संघाचे जेष्ठ नेते अरविंद नाकाडे, सहकार संघटनेचे जिल्हासचिव लाखेश्वर लंजे प्रामुख्याने उपस्थित होते.
शाखाध्यक्ष कैलास हांडगे यांनी कर्मचाऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा जुनी पेन्शनचा मुद्दा शासनस्तरावर लावून धरण्याची आमदार बडोलेंकडे केली असता त्यावर आपल्या सत्कारपर भाषणात आमदार बडोले यांनी ” शिक्षकाचे प्रश्न समस्या त्वरित सोडवण्यात येतील व अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.तसेच कर्मचाऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा जुनी पेन्शनचा मुद्दा शासन स्तरावर लावून धरण्यात येईल” अशी ग्वाही दिली.
जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी आम्ही आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली तसेच पतसंस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.यावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी कीर्तीवर्धन मेश्राम, टिकाराम मातवारे,किशोर लंजे, सुरेश आमले, दयाराम लंजे,प्रशांत चव्हाण, सोमेश्वर मेश्राम, शरद लंजे, विकास नाकाडे व सुभाष शिंदीमेश्राम हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश संग्रामे व आभार संचालक विजय डोये यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे प्रधान व्यवस्थापक विलास फटे, शाखा व्यवस्थापक संदीप तिवाडे, रोखपाल चंद्रकांत तागडे,अमोल ठाकरे,मयूर डोये, निखिल काळे, ललित मुंगमोडे,देवनाथ नागपुरे यांनी परिश्रम घेतले.