देवरी- तालुक्यातील ग्राम मुरदोली परिसरातील घटना अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुख्याध्यापक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान घडली होती. मात्र, त्यांचा गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुकुंदा श्यामराव ताजणे (वय ५८) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील मुरदोली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुकुंदा ताजने हे आपल्या दुचाकी क्रंमांक एम.एच. ३५ ए.क्यू.०९९७ ने मुरदोली येथून मंगळवारी दुपारी ३ वाजता चिंचेवाडा येथे शालेय पोषण आहार ऑनलाइन माहितीच्या बैठकीकरिता जात होते. दरम्यान मुरदोली येथे राष्ट्रीय महामार्ग पार करत असताना देवरीकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुख्याध्यापक ताजने गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.