कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा महामार्गावर दाती भागात बियर बार गोडाऊन फोडून चोरट्यांनी महागड्या विस्की साठ्यासह 1 लाख 68 हजार 560 रूपयाचा मुद्देमाल लंपास केला अज्ञात आरोपीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
महामार्गावर दाती शिवारात अक्षय अप्पाराव दुर्गे यांचे आदर्श बिअरबारमधील गोडाऊन 10ते 12जानेवारी रोजीचे 11वाजण्याच्या दरम्यान टीनपत्राचे गोडाउनचे अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील शटर मधून प्रवेश करून मॅकडॉल विस्की 528 बॉटल किंमत 84 हजार480 रूपये किंमत,रॉयल स्टॉग विस्की 192 बॉटल 36हजार 480 रुपये,रॉयल चैलंज विस्की 48 बॉटल 45 हजार 600 व एक सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर असा 1लाख 68 हजार 580 रूपयाचे मुद्देमाल लंपास केला. सदर प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, बिटप्रमुख शेख बाबरभाई, शिवाजी पवार पोलीस पथकाने भेट दिली.
ठसे तज्ञ पथक घटनास्थळी
दरम्यान सदर चोरी झालेल्या दाती शिवारातील घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी पथकाने भेट दिली. तसेच ठसे तज्ञ पथकाने घटनास्थळी पाहणी केली.