गोंदिया येथील रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बालाघाट येथून चारचाकी वाहनातून तंबाखु गुटका येत असल्याची माहिती मिळाली.त्याआधारे केलेल्या कारवाईत रामनगर पोलिसांनी अंदाजे सहा लाखाचा तंबाखु गुटका वाहनासह पकडला आहे.ही कारवाई रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान बालाघाट येथून तंबाखु घेऊन येणारी गुटखा व्यापार्याची चारचाकी किया हे वाहन मात्र तपासादरम्यान निसटल्याची चर्चा आहे. वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात असून गाडीमालकावर कारवाई होते काय याकडे लक्ष लागले आहे.