नामाकिंत ज्वेलर्स शाॅप मालकाचा मुलाला लक्की लाॅनमध्ये चोरी करतांना पकडले?

0
648

गोंदिया,दि.२५ः-गोंंदिया शहर अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव मार्गावरील लक्की लाॅन येथे २४ जानेवारीला एका लग्नसमारंभात रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास समारंभाला आलेल्या पाहुण्यांचे पर्स तसेच दागिणे चोरतांना काही युवकांना लाॅनच्या व्यवस्थापकाने रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लाॅन येथे रात्रीलाच पोचून संबधित युवकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेल्याचेही वृत्त आहे .यामध्ये दागिणेसह पर्स चोरतांना पकडलेला एक युवक हा गोंदियातील एका नामाकिंत ज्वेलर्स शाॅपच्या मालकाचा मुलगा असल्याची चर्चा असून ज्या बाईकने तो लाॅनमध्ये पोचलेला होता,ती बाईक अद्यापही त्या लाॅनमध्येच आहे.मात्र रात्रीला सदर युवकाला पोलीस ठाण्यात न ठेवता सकाळी हजर राहण्याच्या सुचनेवरुन पोलिसांनी सोडल्याची चर्चा असून या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात,याकडे लक्ष लागले आहे.