33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता गोवंशांची तस्करी करणाऱ्या ट्रकला ढासगडजवळ अपघात,३५ जनावरे ठार

गोवंशांची तस्करी करणाऱ्या ट्रकला ढासगडजवळ अपघात,३५ जनावरे ठार

0
175

blank

गोंदिया,दि.०५ : गोवंशाची तस्करी करणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याने ३५ जनावरे ठार झाल्याची घटना आज बुधवार ५ फेब्रुवारी रोजी  जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरची – चिचगड मार्गावरील ढासगड घाटावर मध्य रात्री सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक पसार झाला असता चिचगड पोलिसांनी त्या वाहन चालकाला सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. गोवंशीय ३५ जनावरे घेऊन जाणारा एम.एच. ३० बीडी १०९५ क्रमांकाचा ट्रक कोरची ते चिचगड मार्गाने जात होता.ढासगड प्रवेश द्वारा समोरील घाटाच्या वळण रस्त्यावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला.या अपघातात ट्रक मध्ये असलेली ३५ जनावरे जागीच ठार झाली तर काही जनावरे जखमी झाली आहेत. ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने ट्रक चालक ही जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सदर ट्रक अपघात या घटनेची माहीती चिचगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.चिचगड मार्गे ही जनावरे कुठुन आणून वाहतूक केली जातात याचा तपास आता चिचगड पोलिस करीत आहेत.

blank