भंडारा : जिल्ह्यातील धानाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व सोन्याचे कोठार म्हणून समजले जाणारे तुमसर शहरातील कापडांना ड्रायक्लीन करणार्या कपड्यांना प्रेस व धुणार्या राजकमल ड्रायक्लीनर्स इंदिरानगर दुकानातून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांच्या मार्गदर्शनात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत हवालाची रक्कम अंदाजे ७ कोटी रुपये जप्त केले आहे.
पोलिसांनी बँकेतील कॅश मशीनने पैसे मोजले तर ही हवालाची रक्कम कुणाची व एवढी मोठी रक्कम कुठून आली, यासंदर्भात अजूनही पोलिसांनी कुठलाही खुलासा केला नसला तरी देखील पोलिसांनी नऊ जणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. सध्या ही रक्कम उपस्थित नागरिकांच्या मते जवळपास सात कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. परंतू अद्याप देखील या रकमेचा मूळ तपशील पोलिसांकडून येणे बाकी आहे.