भानपूरच्या टवाळखोर युवकांनी केला नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनींचा विनयभंग

0
603
गोंदिया,दि.०९: गेल्या काही दिवसापासून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याच्याराच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असतानाच गोंदिया जिल्ह्यातील भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येत असलेल्या परिसरात गावातील टवाळक्या करणार्या मुलांनी नर्सिगंच्या प्रशिक्षणार्थी १९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना महिला दिनीच समोर आल्याने खळबळ माजली आहे.सोबतच गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या सुरक्षा उपायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या 19 विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत असून त्याठिकाणी निवासी आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रात शिकाऊ म्हणून कार्य करीत असून गेल्या १ महिन्यापासून आरोग्य केंंद्र परिसरात वास्तव्यास असून ७ मार्चच्या रात्री सदर प्रशिणार्थी मुली या आपल्या क्वार्टरकडे जात असतांना गावातील काही टवाळखोर समाजकंटक तरुणांनी परिसरातील आरोग्य केंद्राची भिंत ओलांडून आत प्रवेश केला.तसेच संबधित मुलींना अश्लिल भाषेत शिविगाळ करीत विनयभंग करीत व्दिअर्ती शब्दांचा वापर केला.या प्रकाराने घाबरलेल्या मुली धावतपळत आपल्या क्वार्टरकडे जात क्वार्टरचे दार बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वार्टरकडे धाव घेत दगड फेक करीत पुन्हा अश्लिल भाषेत शिविगाळ केल्याची घटना घडली.यामुळे घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील डाॅक्टर व नर्सेस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळाकडे पोचताच या टवाळखोर युवकांनी पळ काढला.यानंतर सदर गोंदिया येथील नर्सिग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर गंगाझरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमर खोब्रागडे यांनी दिली आहे.