उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली; युवक ठार

0
43

देवरी : रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला उभा ट्रॅक दिसून न पडल्याने, दुचाकी ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दुचाकी चालक लोहारा येथील युवक जागीच ठार झाला. भुवन शंकर बडवाईक (३५) रा. लोहारा ता. सालेकसा, जि. गोंदिया असे या अपघातातील मृत युवकाचा नाव आहे. सदर घटना (Bike Accident) देवरी तालुक्यातील रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील ग्राम नवाटोला नजीक वनविभाच्या चेक पोस्टच्या समोर मंगळवार रोजी अंदाजे रात्री ९:३० ते १०:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे.

सविस्तर असे की, लोहारा येथील भुवन बडवाईक हा काही कामानिमित्त आपल्या बजाज कंपनीच्या मोटरसायकल क्रं. एम. एच.३५ ए.ई.५९२४ ने देवरी ते रायपूर रस्त्याने जात असता, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अज्ञात ट्रकला आढळला. कोणीतरी (Bike Accident) अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या ताव्यातील वाहन अंधारात धोकादायक स्थितीत निष्काळजीपणाने या मार्गावरून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना व पादचार्‍यांना अडथळा निर्माण होईल व सदर ट्रकचे कोणत्याही प्रकारची पार्किंग लाईट, टेल लाईट, इंडिकेटर, रिफ्लेक्टर सुरू नव्हते.

तसेच चालकाने आपले ट्रक हा या मार्गवर कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसताना, उभा करून ठेवला होता. मृतकाला अंधाराचा अंदाज न आल्याने मागेहून उभ्या ट्रकला जबर धडक दिली. यात (Bike Accident) दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे, भुवनचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघाताबाबत देवरी पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविले. सदर घटनेचा अज्ञात ट्रक चालकाने पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची माहिती न देता पळून गेल्याने या ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.