बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेगाव शहर माजी अध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचा टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. शेगाव शहरातील मुरारका उच्च माध्यमिक शाळे जवळील वळणावर शुक्रवारी, २८ मार्चला हा दुर्दैवी अपघात घडला.दीपक सलामपुरिया यांची शेगाव बाळापुर मार्गावर वर मुरारका हायस्कूल जवळ दूध डेयरी आहे. आज शुक्रवारी दुपारी ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले होते. तिथून परत येताना रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना लगेच शेगाव येथील सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले.