33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी प्रकरणात शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी प्रकरणात शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक

0
6890

blank

नागपूर,दि.१२ःभंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक पदी बोगस कागदपत्राच्या आधारे पदास मंजुरी दिल्याप्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गडचिरोली येथून अटक करण्यात आली आहे.बोगस शालार्थ आयडी  प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलबिंत केल्यानंतर शुक्रवारी रात्री नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली.त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.

blank