
देवरी- तालुक्यातील मुरदोली गावाजवळ 12 बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाहन चालक फरार झाला. ही कारवाई शनिवार, 5 जुलै रोजी पहाटे 7.30 वाजता दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. MH 40, D 6035 क्रमांकाची महिंद्रा पिकअप आमगाव आदर्श – मुरदोली मार्गे सुसाट वेगाने देवरी महामार्गाकडे जाताना गस्तीवर असलेले पोलिसांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. वाहनाच पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला ह्या ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील मुरदोली गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतला तोपर्यंत चालक पसार झाला होता. वाहनास 12 जनावरे असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल देवरी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरूवात केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्या मार्गदर्शनात पो.ह. परसमोडे, चालक पो.ना. पंकज पारधी, पो.सी. अनिल ऊईके , पो.सी. विनोद बिसेन यांनी केली आहे.