भुयारी गटार योजनेवर आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा

0
40

मुख्याधिकारी मालकर व कंत्राटदारांची उपस्थिती
नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रश्नावरही चर्चा
चित्रा कापसे
तिरोडा–भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मालकर तसेच कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांनी गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक रस्ते खोदले गेले असून योग्य दुरुस्ती न झाल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर आमदार श्री. रहांगडाले यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व प्रशासनाला सूचना दिल्या की काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे.शुक्रवार पर्यंत वेळ देवून रसत्याची डागडुजी करुण सुररित करण्याचे कंट्रातदार ला आमदार यानी बजावले

याच बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था देखील चर्चेचा विषय ठरली. अनेक भागांतील रस्ते खड्डेमय असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी मालकर यांनी दिले.