
गोंदिया,दि.११ :शहरातील अनेक भागात वेश्याव्यवसायाला ऊत आले आहे,काही महिन्यापुर्वी सिव्हील लाईन परिसरातही पोलिसांनी कारवाई केली होती.त्यानंतरही त्या परिसरात हा व्यवसाय सुरु असल्याची चर्चा असतानाच शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जयस्तंभ चौकातील माॅस मेकअप स्टुडिओ एण्ड द बाॅडीस स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय होत असल्याचे उघडकीस आले आहे.याठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली असून तपासाच्यावेळी अंदाजे ३-४ महिलांना त्या ठिकाणाहून सोडविण्यात पोलिसांना यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक गोरख भामरे आणि पोलीस निरिक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात जयस्तंभ चौकातील मॉस मेकअप स्टुडिओ एन्ड द बोंडीस स्पा सेंटर येथे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार तसेच बेटा बचाव राष्ट्रीय अभियान व नशा हटाव संस्थेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष यांचे सह मास मेकअप स्टुडिओ द एन्ड बांडीज स्पा सेंटरच्या आजुबाजूस सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकण्यात आले असता त्या ठिकाणी रुम मध्ये बेडवर ग्राहक सोबत एक महिला आढळून आली. त्या महिलेस विचारपुस केले असता, मास मेकअप स्टुडिओ द एन्ड बॉडीज स्पा सेंटर मालक बळीराम बस्ताराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप बस्ताराम घोटेकर हे स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय करायला लावतात असे सांगितले.त्यावरुन अधिकची स्पा सेंटरची पाहणी करण्यात आली असता पहिल्या मजल्यावर ४ महिला मिळाल्या.त्यांनी सुद्धा स्पा सेंटरचे मालक या ठिकाणी वेश्याव्यवसाय करायला लावतात असे सांगितले.त्यावरुन मास मेकअप स्टुडिओ एन्ड द बॉडीज स्पा सेंटरचे मालक बळिराम बस्ताराम घोटेकर, वय ३५, व दिलीप बस्ताराम घोटेकर, वय ३२,रा. रेलटोली, कस्तुर हॉटेलच्या बाजुला, गोंदिया, ता. जि. गोंदिया यांच्याविरुध्द महिलांना पैशाचे आमिष देवून स्वत च्या आर्थिक फायद्याकरीता वेश्याव्यसाय करतांना आढळल्याने पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक ५४६/२०२५ कलम ३, ४,५.६ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरची कामगीरी सपोनी धिरज राजुरकर, पोउपनि वनिता सायकर, पोहवा राजेंद्र मिश्रा , पोहवा संजय चव्हाण , पोहवा महेश मेहर, पोहवा रियाज शेख, पोहवा प्रकाश गायधने, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर , पो.शि. संतोष केदार, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. छगन विठ्ठले, मपोशि स्मिता तोंडरे, चापोशि राम खंडारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यांनी केली आहे.





