33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता पोषण आहाराचे तांदूळ विकणाºयांवर भंडारा पोलीसांची कारवाई

पोषण आहाराचे तांदूळ विकणाºयांवर भंडारा पोलीसांची कारवाई

0
69

blank

भंडारा,दि.२८ : राईसमिलमध्ये अवैधरित्या पोषण आहाराचे तांदूळ विक्रीसाठी आणलेल्या ट्रकवर भंडारा पोलीसांनी गस्तीदरम्यान कारवाई करून १४ लक्ष ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई २६ जुलै रोजी खरबी ते गौरी रोडवरील साईबाबा राईस मिलसमोर करण्यात आली. सविस्तर असे की, पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेश बैरागी दहशतवाद विरोधी पथक भंडारा हे २६ जुलै २०२५ रोजी त्यांच्या पथकासोबत, पोलीस स्टेशन जवाहरनगर परीसरात पेट्रोलिंग करीत असताना खरबी ते गौरी रोडवरील साईबाबा राईस मिलच्या गोदामसमोर एक ट्रक संशास्पद उभा असल्याची माहिती मिळाली.

त्या माहितीवरून, सदर पथक हे साईबाबा राईसमिल खरबीच्या गोदामसमोर जाऊन त्या ठिकाणी उभा असलेला आयसर कंपनीचा ट्रक कमांक एम.एच.४०/ ऐ. के. २६९१ चा चालक अनिल प्रभाकर रणदिवे (३४), रा मुंढरी/टोला, ता. सडक/अर्जुनी,जि.गोंदिया व ठेकेदार अमित विनायक वाघ (३९), रा विनोबा भावे नगर नागपुर यांना त्यांचे ट्रक मध्ये असलेल्या तांदळाबाबत विचारपुस करून कागदपत्रे मागितले असता,त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देत अधिकृत कागदपत्रे दाखविले नाही.सदर पथकाने ट्रक चालक अनिल प्रभाकर रणदिवे यास विश्वासात घेत विचारपुस केली असता,सदर तांदुळ हा शालेय पोषण आहाराचा असुन,तो तांदुळ ठेकेदार अमित विनायक वाघ याचे सांगणेवरून साईबाबा राईसमिल खरबी / जवाहरनगरचे गोदामात घेऊन आलो.सदर तांदुळ हा शालये पोषण आहाराचा असल्याची खात्री झाल्याने त्या ठिकाणी भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के व भंडारा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी श्रीमती शिल्पा दिलीप निखाडे यांना बोलवुन ट्रकमधील तांदळाची तपासणी करण्यात आली.त्यांनी ट्रक मधील तांदुळ हा शालेय पोषण आहाराचा असल्याचे सांगितल्यानंतर पंचांसमक्ष घटनास्थळी जप्ती पंचनामा कार्यवाही करण्यात आली.त्यानुसार ट्रकमध्ये २१० तांदुळाचे पोते, प्रती पोता ५० किलो प्रमाणे एकुण १०,५०० किलो तांदुळ, प्रति किलो ४६ रुपए प्रमाणे एकुण किमती ४ लक्ष ८३ हजार रूपयाचा तांदुळ व आयसर कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.४०/ऐ. के. २६९१ किमत १० लक्ष रुपए असा एकुण १४ लक्ष ८३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच आरोपी ट्रक चालक अनिल प्रभाकर रणदिवे व ठेकेदार अमित विनायक वाघ,साईबाबा राईसमिलचे मालक सुनिल भावराव गिºहेपुंजे वय ४९,रा.खरबी यांचे विरुध्द पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अप. क्रमांक२७६/२०२५ कलम, ३,७ जिवनावश्यक वस्तु अधिनियम, सह कलम ३३ राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, पो. नि. भिमाजी पाटील, पो.स्टे. जवाहरनगर, स.पो.नि. गणेश बैरागी, स.पो.नि. राजकिरण मडावी, स.फी. संजय कुरंजेकर, रविंद्र गभणे, पो.हवा. प्रमोद वैद्य, विजय तायडे, योगेश सरवरे, शुभम कुलरकर, पो. हाव. राजेश पंचबुधे, संदिप मते, वसंता गजभिये, बाला वरखडे, लोकेश सिंगाडे, नितीन भालाधरे, यांनी यशस्वीरीत्या केली.

blank