
आमगाव,दि.३०ः तालुक्यातील बनगाव येथील गुराखी असलेले यादोराव दलपत नेवारे (वय 59 रा.गणेशटोली बनगांव) हे आज दिनांक 30/7/2025 रोजी 12.30 वाजेच्या सुमारास गाई चारणयाकरीता गेले असता गणेश घाट नाल्यामध्ये पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच आपत्ती निवारण जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत नाल्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.सदर इसमाची बॉडी घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर प्राप्त झाली आहे.





