32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ट्रक्टर अपघातात विद्यार्थी तर अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

ट्रक्टर अपघातात विद्यार्थी तर अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

0
126

blank

जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी रुग्णालयाच जखमींची केली विचारपूस

अर्जुनी/मोर,दि.३० – तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घडलेल्या घटनेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रॅक्टरने उडवल्याने तो गंभीर जखमी तर दुसऱ्या घटनेत अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याने या दोघांनाही उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
तालुक्यातील मानवता विद्यालय बोंडगाव देवी येथील विद्यार्थी गिरीधारी मंगलमूर्ती शिवणकर (वय 14) सायकलने जात असताना इंजोरी ते बोंडगावदेवी रस्त्यावर ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.यात त्याच्या डोक्याला आणि पोटाला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने नागरिकांनी तत्परता दाखवत अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान दुसऱ्या घटनेत, मोरगाव येथील शेतकरी मार्कंड सिताराम वलके (वय 60) हे शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाचे जखमा झाल्या असून चेहरा विद्रूप झाला आहे.बालू नेवारे, नेपाल शहारे, अनिल वलके, सुनील वलके आणि सुधाकर शहारे यांनी तात्काळ मदत करत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एम. बहुरे आणि क्षेत्र सहाय्यक जे.जी. नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देत डॉक्टरांच्या उपस्थितीत पंचनामा केला.आणि वलके यांना गोंदियातील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दोन्ही घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी दोघांनाही सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

blank