25.8 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home गुन्हेवार्ता पिकअपमधून साडेआठ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

पिकअपमधून साडेआठ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

0
4

सालेकसा : तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून १० मोठे पोते सुगंधी तंबाखूचा साठा सालेकसा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या एकूण मालाची किमत ८ लाख ५० हजार रुपये आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) करण्यात आली.
सालेकसा पोलिसांनी गस्तीदरम्यान तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून (क्र. एमएच ३५ एजे१०४२) ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० मोठ्या पांढऱ्या रंगाचे पोत्यांमध्ये प्रत्येकी ५० नग आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट, १० मोठ्या पोत्यांमध्ये २००० नग, आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत दोन लाख रुपये व पाच मोठ्या
फिकट पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये ५० नग एम. डी ७ सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट प्रत्येकी किमती १०० रुपये याप्रमाणे एकूण पाच मोठ्या पोत्यांमध्ये एक हजार नग आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत एक लाख रुपये असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिकअप वाहनचालक महेश
सुशील नेवारे (वय ४१ वर्षे, रा. बहेला ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र) व जगदीश लहुलाल भोयर (वय ३८ वर्षे, रा. अंधियाटोला ता. लांजी जि. बालाघाट) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवि नागोसे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार तूरकर, पो.ना. कान्सकर, पो.शि. वेदक व बैस यांनी केली