नेताजी नगरातून शस्त्रसाठा जप्त

0
8

यवतमाळ , दि. २३ :- यवतमाळ शहरात सुरु असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात अनेक गुन्हेगारांकडे अग्नीशस्त्रासह इतर शस्त्र असल्याची कुणकुण पोलीसांना लागल्यानंतर केलेल्या कारवाईत दारव्हा रोडवरील नेताजी नगरात एका आरोपीकडे धाड टाकली असता बनावटी पिस्टल, मॅगझीन, दोन जिवंत काडतुस, दोन  तलवारी व चार मोठे चाकु असा एकुण ५५ हजार रुपचांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला.२१ फेबु्वारीला यवतमाळ शहरामध्ये सुरु असलेल्या गुन्हेगारी कारवायावर नियंत्रण मिळविण्याचे उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेकडून  सराईत आरोपींची धरपकड राबविण्यात आली होती.त्या मोहीमेमध्ये वसीम खान दिलावर खान रा.नेताजी नगर,यवतमाळ हा कुणाचा तरी जिव घेण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) घेवून नेताजी नगर मध्ये फिरत असुन त्याच्या घरी तलवारी, चाकुचा शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहीती मिळाली. टोळीविरोधी पथकातील कर्मचा:यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने नेताजी नगर मधून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला जिन्सपॅन्टला खोसुन एक देशी बनावटीची पिस्टल (देशी कट्टा) किंमत ५० हजार रुपयाचा व मॅगझीन मध्ये दोन जिवंत काडतुस किंमत १००० रुपयाची विनापरवाना बेकायदेशीरित्त्या मिळून आली. तसेच त्याचे घरुन दोन धारदार लोखंडी तलवार व चार मोठे चाकु असा एकुण ५५ हजार रुपयाचा अवैध शस्त्रसाठा टोळी विरोधी पथकाने वेळीच ताब्यात घेतल्याने यवतमाळ शहरात त्याच्याकडून भविष्यात होणार्या गुन्हेगारी कारवाईला वेळीच पायबंध घालण्यात आला.     सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसींज जाधव, उपविपोअ पियुश जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकूंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवार, ऋृषी ठाकुर, संजय दुबे, गणेश देवतेळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, जयंत शेन्डे, श्रीधर शिंदे, सतीश सिडाम, राजू कांबळे, आकाश सहारे यांनी केली.