36.9 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home गुन्हेवार्ता क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

0
34
अर्जुनी मोरगाव,दि.29 : तालुक्यातील केशोरी येथे गारूडीचा खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या कुटूंबातील दारूड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना आज (ता.२९) समोर आली.मंगला रूपचंद राऊत (३०) रा.झरपडा असे मृत महिलेचे नाव आहे.
या प्रकरणात आरोपी रूपचंद राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील झरपडा येथील रूपचंद राऊत याच्या कुटूंबात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. गावोगावी मुक्कामी राहून त्या ठिकाणी गारूडीचे खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असे. गेल्या आठ दिवसांपासून केशोरी येथे राऊत याचे कुटूंब मुक्कामी होते. काल (ता.२८) रात्री १२ वाजता सुमारास रूपचंद राऊत याने दारूच्या नशेत क्षुल्लक वादावरून पत्नी मंगला वर घाव घालून तिची हत्या केली. हत्येनंतर तो आपल्या मुक्कामी ठिकाणीच राहिला. सकाळी रक्ताच्या थारोड्यात आई मंगलाला पाहून मुलांनी आरडाओरड केली. आणि प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच केशोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंद राऊतला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.