41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, कुटुंबीयांविरोधात गुन्हा

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, कुटुंबीयांविरोधात गुन्हा

0
267

मुंबई ,दि.03ः- मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टापायी सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण व कुटुंबीयांविरोधात विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे आरोप निखालस खोटे असून आपल्या सुनेचे चार जणांशी विवाहबाह्य संबंध आहेत. परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याची तयारी आपल्या मुलाने दर्शवली होती परंतु तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे विद्या चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्यासह पती अभिजित, मुलगा आनंद, त्याची पत्नी व चव्हाण यांची दुसरी सून शीतल तसेच तक्रारदार सुनेचा पती अजित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चव्हाण कुटुंबीयांविरोधात सुनेेने १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती.