नवी दिल्ली(वृत्तसंस्था)ः-केंद्र सरकारने ओबीसीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सैनिकी शाळांमध्येही ओबीसीच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २0२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सैनिक शाळांमध्ये सध्या १५ टक्के जागा या अनुसुचित जातींसाठी ७.५ टक्के अनुसुचित जमातींसाठी, लष्करातल्या आजी माजी कर्मचार्यांसाठी २५ टक्के, तर राहिलेल्या जागांमध्ये ओपन कॅटेगिरीतल्या मुलांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकराखाली देशात ३३ सैनिक शाळा चालवल्या जातात. या संबंधीचे आदेश १३ ऑक्टोबरला काढण्यात आले असून ते सर्व शाळांच्या प्राचार्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही अजय कुमार यांनी ट्विटरवर दिली आहे. शाळांमधल्या ६७ टक्के जागा या ज्या ठिकाणी ती शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित मुलांसाठी असतात तर ३३ टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात.या निर्णयामुळे देशभरातल्या मुलांना फायदा होणार आहे.देशातील ओबीसीसाठी लढणार्या अनेक संघटना यासाठी गेल्या दोन तिन दशकापासून लढा देत होत्या.