
गोरेगाव- शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या पाच वर्षापासून प्राध्यापक भरती झाली नाही संध्या महाविद्यालयाचा शिक्षणाचा डोलारा घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांवर उभा आहे त्यातही या वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन लागल्यामुळे त्यांना घरी बसावे लागले आहे आज नऊ महिन्याचा कालावधी लोटला परंतू ना पूर्णकालीन भरती ना घड्याळी तासिका तत्वावर भरती यामुळे उच्च शिक्षण घेऊन सुध्दा संसाराचा गाडा ओढणे दिवसेनदिवस अवघड होत चालले आहे तीन दिवसावर दिवाळी आहे पण चिंतातुर घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांची दिवाळी अंधारातच आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.