
सडक-अर्जुनी दि. 9: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देशव्यापी संपात सहभागी होऊन तहसीलदारमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन दिले.
१ नोव्हेंबर २00५ नंतर लागलेल्या जि.प. शिक्षकांना जुन्या प्रमाणे पेंशन योजना लागू करावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करणे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना संगणक, इंटरनेट, ई लर्निंग सुविधा देण्यात याव्यात, सर्व शाळांना मोफत वीज, पाणी पुरवठा करावा, सर्वच मुलांना गणवेश देण्यात यावा, वर्ग १ ७ च्या शाळांना पटसंख्येची गट न ठेवता मुख्याध्यापक देण्यात यावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा, रखडलेल्या बदल्यांची कार्यवाही करावी, मुख्यालयाची अट रद्द करावी, एमएससीआयटी करीता मुदतवाढ द्यावी, गोंदिया जिल्ह्यातील कर्मचार्यांना इतर नक्षलग्रस्त जिल्ह्याप्रमाणे अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे, गोंदिया जिल्ह्यातील पदवीधरांना पदोन्नती करण्यात जिल्हा परिषदेला आदेश देण्यात यावे, गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबीत समाजांचा निपटारा करण्यसासाठी जिल्हा परिषदेला आदेश देण्यात यावे इत्यादी समस्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीचे तालुका सरचिटणीस डी.आर. जिभकाटे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष पी.एन. बडोले, शिक्षक नेते पी.एस. उके, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक, किशोर डोंगरवार, वीरेंद्र वालोदे, रमेश बडोले, एस.डी. कापगते, मंगेश पर्वते, राजेश शेंडे, मोरेश्वर राऊत, हेमंत मडावी, आनंद मेश्राम, जे.डी. म्हशाखंत्री, देवा शहारे, अरविंद कापगते, व्ही.जे. चाटे, पी.एस. गुट्टे, एकनाथ लंजे, महेश भिवगडे इत्यादी सहभागी होते.याप्रसंगी नायब तहसीलदार ए.आर. मेश्राम यांनी निवेदन स्वीकारुन लगेच मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले.