सडक-अर्जुनी दि. 9: वडेगाव येथील नवीन ग्राम पंचायत भवनाचा उद््घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य गंगाधर परसुरामकर, प्रमुख पाहुणे प.स. उपसभापती विलास शिवनकर, पं.स. सदस्य राजेश कठाणे, सरपंच मेंढे, खंडविकास अधिकारी आर.जे. धांडे, राजेंद्र खोटेले, राधीका हुकरे उपस्थित होते. पालकमंत्री बडोले यांनी वडेगावात येणार्या कोणत्याही अडचणी सोडविण्यास तत्पर राहु असे सांगितले. तसेच विकासात्मक कार्य करण्यास प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्षीय भाषणात गंगाधर परशुरामकर म्हणाले की, गावातील अंतर्गत रस्ते, पाण्याची समस्या, सुरक्षा भिंत मुलांना शिक्षणासाठी वर्गखोली आदी समस्या सोडविण्यास मी मदत करील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्राम पंचायतचे सचिव सुभाष शिरसान यांनी केले. यावेळी गावकरी उपस्थित होते.