
तिरोडा,दि.26:शिक्षक सहकार संघटना तालुका तिरोडाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्येविषयी निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी अपघात विमा रु 354 ची नोंद करणे, नामनिर्देशन फॉर्म शिक्षकाकडुन मागवून घेणे,पारित झालेली वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक प्रदान करणे, शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करणे,दुय्यम सेवापुस्तिका तयार करण्यासाठी केंद्रानिहाय कॅम्प लावणे, चटोपाध्याय व हिंदी मराठी भाषा सूट प्राप्त प्रस्ताव त्वरित जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावेत, 7 व्या वेतन आयोगाचे वेतननिश्चिती लेखा व वित्त अधिकारी यांच्या कडून मान्यता घ्यावी, जुने व नवीन डीसीपीएस क्रमांकाची नोंद सेवापुस्तिकेत घ्यावी या मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले.
वरील सर्व मुद्द्यांवर गटशिक्षणाधिकारी श्री.पारधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले तसेच शिक्षकांचे कोणतेही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहणार नाही याची ग्वाही दिली. लवकरच दुय्यम सेवापुस्तिका तयार करण्यासाठी केंद्रनिहाय शिबिर लावले जाणार आहे, कोणत्याही शिक्षकांचे काम प्रलंबित राहणार नाही याकरिता वरिष्ठ लिपिक मडावी यांना निर्देशित केले.
सदर भेटीवेळी तिरोडा तालुकाध्यक्ष संतोष पारधी, तालुकासचिव परमानंद रहांगडाले, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी,तालुका सल्लागार हितेश रहांगडाले, तालुका मार्गदशक संजय रहांगडाले,मानकर, तालुका महिला प्रमुख प्रतिमा खोब्रागडे, तालुका महिला संघटक शिल्पा रंगारी,योगिता पारधी, तालुका महिला सचिव शिलाताई खरवडे उपस्थित होते.





