मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज 14 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

0
15

वाशिम दि.१२ –  महाडिबीटी प्रणालीवरील सन 2021-22 या सत्रातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज व त्रृटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांचे लॉगीनला परत करण्यात आलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जाची संख्या मोठया प्रमाणात प्रलंबित आहे.

             प्रलंबित अर्जाची संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांनी त्रृटी पुर्तता करुन आवश्यक कागदपत्रांसह पात्र अर्ज 14 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे सादर करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर ऑनलाईन योजनांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाचे अर्ज 14 एप्रिलपर्यंत अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईन फॉरवर्ड करावे. सेंट बॅक अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात त्वरीत निकाली काढावे. अन्यथा विहीत मुदतीत अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर न केल्यास व विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहील. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.