महाज्योतीच्या संघर्षाला विराम ; आझाद मैदान मुंबई येथील लढ्याला यश!

0
42

मुंबई,दि.05 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) माध्यमातूनतू पीएचडी करणा-या ओबीसी विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्वृतीत घसघशीत वाढ करण्यात आली आहे.गेल्या ५३ दिवसांपासून महाज्योती संघर्ष समितीकडून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. आता या लढ्याला यश आले असुन महाज्योतीच्या संघर्षाला विराम मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे

21 हजारांची मासिक शिष्यवृत्ती 31 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएचडीकरता निवडलेल्या 753 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.’महाज्योती’ तर्फे विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.याकरीता साडेचार कोटींचा अतिरीक्त भार सरकारच्या तिजोरीवर येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षिक खर्च आहे. शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांन केली होती.

दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेमार्फत PhD-M.Phil करणाऱ्या OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2022 प्रति महिना 31000 रुपये Fellowship देण्याचे मान्य केले.तसेच यूपीएससी व एमपीएससी तयारी करणाऱ्या प्रत्येकी 1500 विद्यार्थ्यांना अनुक्रमे 12000 रुपये व 10000 रुपये मासिक विद्यावेतन व ऑफलाइन क्लास देण्याचे मान्य केले आहे.

या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. अखेर विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आता शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली.महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना आज खऱ्या अर्थाने ओबीसी, भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी न्यायाचा दिवस आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायप्रिय लोकशाहीच्या स्वप्नाला पुर्णत्त्वाकडे नेणारा हा दिवस आहे. न्याय मागून मिळत नाही न्यायासाठी लढा द्यावा लागतो. आपल्या महापुरुषांची ही शिकवण आपणच अंगिकारायला हवी. संघर्षाच्या तत्त्वज्ञानाला जागून टोकाचा संघर्ष केला व विजय मिळाला. हा विजय महात्मा ज्योतिबा फुले यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले.