विद्यार्थ्यांसाठी दहावीचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर करिअर घडवण्यासाठी अनेक पर्याय असतात. परंतु दहावीनंतर आपण नेमका कोणता कोर्स निवडता यावर तुमचं सर्व भवितव्य अवलंबून असतं. दहावीनंतर विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम देखील करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ITI अभ्यासक्रम देखील उत्तम पर्याय असू शकतो. तर आज आपण दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत हे जाणून घेऊयात…
दहावीनंतर या क्षेत्रात करा करियर :
कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग : संगणकाच्या युगात कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या क्षेत्रात, तुम्हाला संगणक दुरुस्ती आणि नेटवर्किंगशी संबंधित माहिती मिळते जी चांगली नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थी दहावीनंतर कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंगचे क्लास करू शकतात.
इंजीनियरिंग डिप्लोमा : कित्येक पालकांचं स्वप्न असत की आपला मुलगा इंजिनियर असावा. त्यामुळे दहावीनंतर विद्यार्थी इंजीनियरिंग डिप्लोमा देखील करू शकतात. इंजीनियरिंग डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या अगदी सहज मिळू शकतात. त्यामुळे दहावीनंतर इंजीनियरिंग डिप्लोमा करियरसाठी उत्तम मार्ग आहे.
ITI : 10वी नंतर ITI हा देखील चांगला पर्याय आहे. यामध्ये विद्यार्थी कॉम्प्युटर, वेल्डर, फिटर, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, स्टेनो असे अनेक विषय निवडू शकतात. यामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील सुरु करून अगदी सहजपणे चांगले पैसे कमवू शकता.