एक्यूट पब्लिक शाळेतील कैफ अंसारी वाणिज्य शाखेत जिल्ह्यातून प्रथम

0
33

गोंदिया,दि.09 मागील अनेक वर्षापासून एक्युट पब्लिक शाळेचा निकाल सतत १०० टक्के लागत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात एक्यूट पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उंचभरारी घेतली.एक्युट पब्लिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतून वाणिज्य शाखेत कैफ अंसारी या विद्यार्थ्याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर कुमारी नीलम उईके ह्या विद्यार्थीनीने ७७.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमती गीताताई भास्कर,सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव श्रीमती शुभाताई शहारे तसेच शाळेचे प्राचार्य अमितकुमार ,  मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला पारधी,पर्यवेक्षक  प्रविणकुमार मेश्राम,सकंटमोचन पांडे,कुमारी ललिता कुथे, कुमारी रागिणी शाहू व सर्व शिक्षकगण आणि आईवडिलांना दिले आहे.सर्व विद्यार्थ्याना संज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.