गोरेगाव,दि.09:इयत्ता वर्ग 12 वीच्या जाहिर झालेल्या निकालात तेढा येथील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान विभागातून शुभम डॉक्टर येरणे 84.50 टक्के घेऊन प्रथम,कौशिक तरुण कोटांगले 81.50 द्वितीय,कु.दिव्या जयदेव बिसेन 80.67 तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कला विभागातून कु.एकादशी श्रीपत वाढई 76.17 टक्के गुण घेत प्रथम, कु .गायत्री हंसराज भोयर व कु. कोमल झामाजी टेकाम यांनी संयुक्त 75 टक्के घेऊन व्दितीय, मोहित नंदकिशोर उके 72.33 तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेत एकूण 128 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यातून 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल 99.21टक्के लागला. कला शाखेत एकूण 94 विद्यार्थी होते त्यातून 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा एकूण निकाल 92.55 टक्के लागला.बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल यशाचे श्रेय प्राचार्य व सर्व विषय शिक्षक यांना दिले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था सचिव भाऊसाहेब गोस्वामी ,सह- सचिव विभाताई, प्राचार्य सुशांत बी.गोस्वामी प्रा.पी.झेड.कटरे, ओ.आय.रहांगडाले,प्रा.डॉ.जी.एम.बघेले व इतर सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.