अंधत्वावर मात करुन परसवाड्याच्या विनोदची 12 वी मध्ये उंच भरारी

0
20

– वर्ग शिक्षक व समग्र शिक्षाच्या चमूचे विशेष अभिनंदन.

गोंदिया,दि.10ः नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 12 वीच्या निकालात जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल परसावाडामध्ये शिकणाऱ्या व जन्मतःअंध असलेल्या विनोद हेमराज कवरे (मु.बोरा) याने 66.66% टक्के गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाने इयत्ता 12 वीची परिक्षा पार पडली. या परीक्षेत जिल्हयातील एकूण सर्व प्रकारचे 206 दिव्यांग विदयार्थी परीक्षेला बसले होते.यात तिरोडा तालुक्यातील बोरा येथील हेमराज कवरे यांचा मुलगा जो जन्मतः अंध आहे.त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल विनोदचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) कादर शेख, जिल्हा समन्वयक (दिव्यांग विभाग) विजय ठोकणे यांनी कौतुक केले आहे.