जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सभामंडपाचे भूमिपूजन

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगांव,दि.10:-आदिवासी जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या 122 वी पुण्यतिथी निमित्त ग्राम तिल्ली(मोहगाव) येथे खासदार सुनिल मेंढे यांच्या स्थानिक निधीतून सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन टोपराम मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य ससेंद्र भगत,पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे, पंचायत समिती सदस्य रामू माहारवाडे, सरपंच ओमा पटले, तंटामुक्ती अध्यक्ष दादूजी गावड, पंधराम गुरुजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.