गोंदिया,दि.10ः उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत. मात्र, विदर्भातील जून महिन्यातील तापमान लक्षात घेता 27 जूनला शाळांची घंटा वाजणार आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
तारखेचा सम्रंभ संपला
गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना होता. याबाबत शिक्षण विभागाने अखेर तारीख घोषित केली आहे. त्यामुळे पालक आणि शालेय विद्यार्थ्यांना शाळा घडण्याबाबत तारखेचा सम्रंभ संपला आहे.
हा आहे शासन आदेश?
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे 2022-23 शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शासन निर्णयात म्हटले की, प्रारंभी 13 तारखेला राज्यातील शाळा सुरू होत असल्या तरी दोन आठवड्यांनंतर म्हणजे 27 जून रोजी विदर्भातील शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष दिलेल्या तारखांमध्ये सुरु करण्याबाबत निर्देश आहे. याअनुषंगाने काही सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भासाठी काय आहेत सूचना?
- विदर्भातील शाळांबाबत 24 जून ते 25 जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करावी.
- शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड -19 प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बबोधन करावे.
- 27 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्याच्या सूचना द्याव्या.
- शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे व पालकांचे कोविड-19 प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन व उद्बबोधन करण्यात यावे.