अपक्ष उमेदवार विकास सुभाषराव वायदंडे यांचा प्रचार शुभारंभ

0
37

*”आपला अपक्ष उमेदवारचं भारी”म्हणत*जोरदार एन्ट्री

सांगली,दि. 19(प्रतिनिधी ) सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक २०२२ ची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच निमित्ताने दि १८ जून रोजी गुड्डापुर येथे अपक्ष जिल्हा राखीव गट अनु.जाती उमेदवार विकास सुभाषराव वायदंडे यांचा जत तालुका प्रचार शुभारंभ करण्यात आला. गुड्डापूर येथील धानेश्वरी देवस्थान मधून शिक्षक बांधवांच्या व इतर शिक्षक संघटनांच्या पदाधिकऱ्यांचा उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ नारळ फोडण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. याशिवाय जत तालुक्यातील विविध क्षेत्रात नामांकित शिक्षक ही या प्रचार शुभारंभास उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मिळून अपक्ष उमेदवार विकास सुभाषराव वायदंडे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी हर प्रकारे मदत करण्याची तयारी दर्शवली.
विकास वायदंडे यांनी गेल्या काही वर्षात अनेक शिक्षकांचे जिल्हा परिषद स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील १नोव्हेंबर २००५नंतर नियुक्त शिक्षकांची राष्ट्रीय पेन्शन योजनेतील हिशेब चिठ्ठ्या पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कामामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय आहे. याचाच परिणाम म्हणून या निवडणुकीत त्यांना सामान्य शिक्षकांचा पाठिंबा वाढत चाललेला दिसून येत आहे.

बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी व सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून विकास वायदंडे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. सर्वसामान्य शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी
सांगली जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही बनवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस तसेच पारदर्शक व सभासदांच्या हिताचे निर्णय होण्यासाठी कारभारावर अंकुश ठेवणे असा मानस यावेळी विकास वायदंडे यांनी व्यक्त केला.

प्रचार शुभारंभ प्रसंगी अनेक शिक्षकांनी आपली मते मनोगत मध्ये महेश माळी, सदानंद सवाईराम, जितेंद्र बनसोडे, हणमंत सोनवणे,सगळेजण ताकतीने काम करू.व्यवस्था परिवर्तित करण्यासाठी पूर्ण योगदान देवून आपल्या सर्वांना अभिमान वाटावे असे कार्य निश्चित करू.सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून आपली भूमिका प्रत्येक सभासद बंधु भगिनी पर्यंत पोहोचवू असे शिक्षक बांधवांनी मनोगत व्यक्त केले .व विकास वायदंडे यांना बहुमताने निवडून आणू असा निर्धार केला.

यावेळी विश्वास खंडागळे, अशोक चव्हाण, हणमंत सोनवणे, रावसाहेब चव्हाण, मल्लिकार्जुन कोळी, धनराज मेढेकर,विजय बुरकुले, सुमित लेडांगे, मुबारक पठाण, सदानंद सवाईराम,जिदेंद्र बनसोडे, महेश कुमार माळी, अनिल भोळे, विशाल हेपट, संतोष येंदे,फिलिफ कोकणी, सुनिल साळवे, दिलीप वाघमारे,माळगोंडे अभिजित,राहुल राठोड,नरेश मदीकुंटावार, चेतन लांडे,गावित सर, अनिल पवार, सुनील अहिरे,महेश अहिर, चौधरी सर,बोईनवाड सर, देविदास ठोकळे, तुषार अन्नमवार,तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व इतर शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमास प्रास्ताविक अनवर मुजावर केले तर आभार सिकंदर मुजावर यांनी केले.