मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात नवागतांचे स्वागत

0
19

गोरेगाव,दि.22 :- मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे 21 जुन रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी सत्र 2022-23 चे पहिले दिवस नवागतांचे स्वागत करण्यात आले. नवीन भरती झालेल्या विध्यार्थ्यांना व शिक्षकांना प्राचार्या सौ.सी.पी.मेश्राम यांच्या उपस्थितीत शाळेचे संस्थापक प्रा.आर.डी.कटरे व संचालिका सौ.एस.आर. कटरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, भेटवस्तू व मिठाई देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमातून मार्गदर्शन करून प्रा.आर.डी.कटरे सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग्य दिन उत्साहात साजरा…
गोरेगाव :- मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग्य दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे, संचालिका सौ.एस.आर.कटरे, प्राचार्या सौ.सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षिका एस.डी.चिचामे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते.