30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक प्रा. पुजा धुमनखेडे यांना पीएचडी

प्रा. पुजा धुमनखेडे यांना पीएचडी

0
139

blank


देवरी,दि.10- साकोली येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण विद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या पुजा धुमनखेडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात सादर केलेल्या शोधप्रबंधासाठी नुकतेच पीएचडी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

अत्यंत मृदूभाषी असलेल्या प्रा. पुजा धूमनखेडे यांनी ‘विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थानाचे शैक्षणिक तत्वज्ञान व कार्यप्रणालीचा सर्वकष’ अभ्यास या विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. हे शोध प्रबंध सादर करण्याकामी त्यांना डॉ. अर्चना तांबोळी यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. पुजा धुमनखेडे यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले पती डॉ. दीपक धुमनखेडे यांचेससह इतर सहकारी यांना दिले आहे.

blank