‘ज्ञानदीप’ संस्थेस वाढीव दराबाबतचा कोणताही निर्णय नाही; इतर मागास बहुजन कल्याण विभाग

0
12

मुंबईदि. 19 : एम. पी. एस. सी. प्रशिक्षणासाठी पुणे स्थित ज्ञानदीप अकादमी संस्थेने वाढीव दर निश्चित करण्याबाबत केलेल्या मागणीवर कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

महाज्योतीनागपूर मार्फत सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील इतर मागास वर्गविमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एम.पी.एस.सी.चे प्रशिक्षण नामवंत प्रशिक्षण संस्थांकडून देण्याकरिता ई – निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. ई – निविदा प्रक्रियेत एम.पी.एस.सी चे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे स्थित ज्ञानदीप अकादमी या संस्थेची निवड झाली होती. त्यानुसार संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला होता.

संस्थेस पुढील २ वर्षांची मुदतवाढ देण्याची तरतूद सामंजस्य करारात असल्यामुळे सन २०२२-२३ करिता एम.पी.एस.सी चे प्रशिक्षण ज्ञानदीप अकादमीपुणे यांच्यामार्फत निर्धारित केलेल्या दराने देण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय दि. १७ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीत महाज्योतीच्या संचालक मंडळाने घेतला.

तथापिदरम्यानच्या काळात एम.पी.एस.सी परीक्षेचा अभ्यासक्रम व पद्धत बदलल्याने एम.पी.एस.सी अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल झाला. त्यामुळे ज्ञानदीप अकादमीपुणे या संस्थेने नवीन दर निश्चित करण्याबाबतची विनंती महाज्योती संस्थेस केली होती. त्या अनुषंगाने दि. २६ सप्टेंबर२०२२ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मात्रअद्याप दरवाढीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.