
मोहिमेच्या नियोजनाबाबत बैठक
वाशिम,दि.१६ -समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून राज्यात जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम मंडणगड पॅटर्ननुसार राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ.छाया कुलाल व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या उपस्थितीत मंडणगड पॅटर्न प्रभावीपणे राबविण्यासठी जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादुत यांची आज १६ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादुत,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये डॉ.छाया कुलाल यांनी मंडणगड पॅटर्न अंतर्गत कामकाजाचे नियोजन करून सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राचा ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी जिल्हातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील समान संधी केंद्राशी संपर्क साधून कामकाज करण्याच्या सुचना समतादुतांना दिल्या.श्री.वाठ यांनी सुध्दा उपस्थित समतादुतांना याबाबत मार्गदर्शन केले.